आज दिनांक 2 सप्टेंबर सकाळी 9 वाजता सिल्लोड येथील नॅशनल उर्दू शाळेच्या मतदान केंद्रावर आज काही काळ तणाव निर्माण झाला. उमेदवार स्वतः मतदान केंद्राच्या आत आल्याचा आरोप करत प्रतिनिधींमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. परिस्थितीचा तणाव वाढू लागल्याने काही क्षण गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून दोन्ही बाजू शांत केल्या आणि मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत करण्यात आली.