उरण: खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते उरण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
Uran, Raigad | Nov 11, 2025 आज खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते उरण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. या कार्यालयाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या समस्यांचे तातडीने निवारण होईल, तसेच पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवता येतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा, कार्य आणि विश्वासाचा हा केंद्रबिंदू बनेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. या महत्त्वपूर्ण प्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी रुपेश पाटील यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.