जालना: घाटी रुग्णालयात संतापजनक प्रकार; रुग्णांकडूनच बेडशीट बदलून घेतल्याने प्रश्नचिन्ह
व्हिडिओ समोर आल्यानंतर कारवाईची मागणी
Jalna, Jalna | Apr 20, 2026 घाटी रुग्णालयात संतापजनक प्रकार; रुग्णांकडूनच बेडशीट बदलून घेतल्याने प्रश्नचिन्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर कारवाईची मागणी, लोकप्रतिनिधींवरही नाराजी आज दिनांक 20 सोमवार रोजी सकाळी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : हा काय प्रकार आहे? घाटी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही का? की फुकटचे खायची सवय झाली? वरिष्ठ अधिकारी झोपा घेतात काय? पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांकडून पलंगावरील बेडशीट बदली करून घेताना लाजा कशा वाटत नाहीत? असे संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे