गंगापूर: गंगापुर येथील मारवाडी गल्ली येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
आज शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की गंगापुर मारवाडी गल्लीतील रहिवासी मनोज गोवर्धन लाहोटी (वय ३५) यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच, रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.लाहोटी यांना तातडीने गंगापूर घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे मारवाडी गल्ली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.