चांदूर बाजार: देउरवाडा येथे हनुमान मंदिरासमोर ठेवलेली दुचाकी लंपास, शिरजगाव कसबा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
आज दिनांक नऊ नोव्हेंबरला पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील देऊरवाडा येथे हनुमान मंदिरासमोर उभी ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार, शिरसगाव कसबा येथील शेषराव सोमाजी भवरे यांनी दिनांक 8 नोव्हेंबरला दुपारी एक वाजता शिरसगाव कसबा पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून शिरजगाव कसबा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे