उरण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. एकूण २१ जागांपैकी १२ जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवून नगरपरिषदेत सत्ता स्थापनेसाठी मजबूत बहुमत सिद्ध केले आहे. या विजयानंतर सर्व नवनिर्वाचित उमेदवारांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची बुधवारी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व १२ विजयी उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील जनसेवेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.