औंढा नागनाथ: अतिवृष्टीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत द्या;तहसील कार्यालय येथे ठाकरे शिवसेनेची निवेदनाद्वारेमागणी
औंढा नागनाथ तालुक्यात मागील चार दिवसापासून अधून मधून ढगफुटी सदृश्य पाऊस पडून अतिवृष्टी होत आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या खरीपातील सोयाबीन उडीद मूग तूर तसेच हळद पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे दिनांक १४ व १५ सप्टेंबर रोजी उखळी, जलालपूर, चिंचोली निळोबा उंडेगाव दौडगाव,रामेश्वर, हिवरखेडा, केळी, केळीतांडा, अनखळी, नांदखेडा, बेरूळा या भागात अतिवृष्टीने पिके खरडून गेली काही पिके पाण्याखाली गेली तसेच अनेक घराची पडझड झाली शासनाने अतिवृष्टी नुकसान पंचनामे करून हेक्टरी ५० हजारची भरपाईची मागणी केली