गडचिरोली: नागरिकांनी रि-केवायसी व सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घ्यावा - भारतीय रिझर्व्ह बँकेचे क्षेत्रीय संचालक सचिन शेंडे
संपूर्ण भारतभर सुरू असलेल्या वित्तीय समावेशन अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर एकूण 458 गावांमध्ये शिबिरे/कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. हे अभियान 01 जुलै 2025 पासून सुरू असून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत राबविण्यात येणार आहे. राज्यस्तरीय बँकर्स समिती (SLBC), भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), सर्व बँका तसेच अग्रणी जिल्हा प्रबंधक कार्यालय, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.