दिग्रस: नगर परिषद निवडणूकसाठी पहिल्याच दिवशी दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल
आगामी २ डिसेंबर रोजी होणाऱ्या दिग्रस नगर परिषद निवडणुकीसाठी आज दिनांक १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी दिग्रस तहसिल कार्यालयात नामांकन अर्ज कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत दोन अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. नगराध्यक्ष पदासाठी चंदना संदेश तुपसुंदरे यांनी अर्ज दाखल केला असून, प्रभाग क्रमांक १२ (ब) मधून एजाज खान नवाज खान यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला आहे.