सिंदेवाही तालुक्यात लोकसंख्येने सर्वात मोठे ग्रामपंचायत असलेल्या नवरगाव येथील बस स्थानक परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून रहदारीच्या रस्त्यावर गुजरी भरत असल्याने या मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे मात्र पंचायत पदाधिकारी व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सदर चौकात अतिक्रमण वाढलेले आहे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन सदर चौकातील अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावी अशी मागणी सामाजिक युवा ब्रिगेडचे अध्यक्ष अमोल निनावे यांनी केली आहे