अमरावती: टीईटी निर्णयाविरोधात शिक्षक महासंघाची सर्वोच्च न्यायालयात धाव; “हा लढा शिक्षकांच्या अस्तित्वाचा” – चंद्रशेखर भोयर
माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण करणे अनिवार्य ठरविणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष आहे. विशेषतः २०१३ पूर्वी नियमांनुसार नियुक्त झालेल्या शिक्षकांमध्ये असुरक्षितता वाढली आहे. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सह-संयोजक श्री. चंद्रशेखर भोयर यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांन