नागपूर शहर: पोलीस असल्याची बतावणी करून सामान्य जनतेला लुटणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने घेतले ताब्यात
15 सप्टेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट 3 चे पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस असल्याची बतावणी करत सामान्य जनतेला लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अटक केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी दिली आहे.