पोंभूर्णा: आटोतून पडल्याने एका महिला मजुराचा मृत्यू तर एक महिला जखमी, हत्तीबोडी येथील घटना
धान कापणीनंतर सायंकाळी ऑटोने परत जाताना चालकाच्या चुकीने तोल गेल्याने रस्त्यावर पडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक जखमी झाली. ही घटना बुधवारी (दि. १२) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चेक हत्तीबोडी गावाजवळ घडली. प्रिया रोहित मडावी (३५, रा. गोमपाटील तुकूम) असे मृतक महिलेचे नाव आहे.