जळगाव: प्रेमसंबंधाच्या संशयावरून रामदेववाडीत तरूणाला बेदम मारहाण; एमआयडीसी पोलीसात ६ जणांवर गुन्हा दाखल
प्रेमप्रकरणाच्या संशयावरून जळगाव तालुक्यातील रामदेववाडी परिसरात एका तरुणाला मारहाण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मंगळवारी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.