गावठीकट्टा बाळगणारे दोन सराईत गुन्हेगार अहिल्यानगर शहरातील आयुर्वेद कॉर्नर ते अमरधाम परिसरातून कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दोन जिवंत काडतुसे असा एकूण १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. अनिल लक्ष्मण गायकवाड (वय ३९ रा. गांधीनगर बोल्हेगाव अहिल्यानगर), ओमरत्न फुलकेश भिंगारदिवे ( रा. नालेगाव, अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.