जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी ६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव शहरात भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले. या रोड शोला शहरवासीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रमुख मार्गांवर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत मुख्यमंत्री फडणवीस यांचे जोरदार स्वागत केले.