दर्यापूर: कुटुंबा येथे दिवाळीनिमित्त गरीब आदिवासी बांधवांना मदतीचा हात;कौसल्याबाई जगन्नाथ मालपाणी चॅरि.ट्रस्ट,बनोसा यांचा उपक्रम
मेळघाटातील अतिदुर्गम भागातील गरीब व गरजू आदिवासी बांधवांसाठी दिवाळीनिमित्त आनंदाचा किरण ठरला आहे. कौसल्याबाई जगन्नाथ मालपाणी चॅरिटेबल ट्रस्ट, बनोसा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक बांधिलकी जपत मदत उपक्रम राबविण्यात आला.तालुक्यातील कुटुंबा परिसरात आयोजित या उपक्रमात ट्रस्टतर्फे आदिवासी बांधवांना आज दुपारी १२ वाजता किराणा साहित्य,कपडे आणि ब्लँकेट वाटप करण्यात आले. याप्रसंगी आदिवासींनी उपस्थित मान्यवरांचे गद्ली सुसून नृत्याने स्वागत केले.