महागाव तालुक्यातील खेडी वानोली येथे शेतकऱ्यांच्या सार्वजनिक शेतकरी रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. हा रस्ता गावनमुना आठ मधून चुकीच्या पद्धतीने हटवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप असून संबंधित व्यक्तीने रस्त्यावर घराचे बांधकाम सुरू केल्याने शेतकऱ्यांची ये-जा ठप्प झाली आहे. ग्रामस्थांनी आज दि. ६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान तहसीलदार बीडीओ, एसडीओ उमरखेड यांच्याकडे पुराव्यांसह निवेदन दिले आहे.