जालना: नंदिग्राम एक्सप्रेस एसी बोगी सजावट प्रकरणी 2 टीटी निलंबित,बी.रितेश, रेल्वे विभागीय मॅनेजर रेल्वे स्टेशन येथे दिली माहिती
Jalna, Jalna | Jul 9, 2026 आज दिनांक नऊ जुलै 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन जालना येथे रेल्वे विभागीय मॅनेजर यांनी अधिकृत माहिती दिली आहे की सहा जुलै रोजी नंदिग्राम एक्सप्रेस एसी बोगी एका नवविवाहित जोडप्याने हनिमून साठी सजवली होती याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित 2 टीटी यांना निलंबित करण्यात आले असून ज्याने हे डेकोरेशन केले त्याचा सुद्धा पोलीस रेल्वे विभाग शोध घेत असून त्याच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.