उमरी: गोरठा पॉईंट येथे सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण केल्या प्रकरणी उमरी पोलिसांत गुन्हा नोंद
Umri, Nanded | Oct 26, 2025 दि. 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास गोरठा पॉईंट रोडवर उमरी येथे आरोपी कैलास सोनाजी सूर्यवंशी वय 35 वर्ष व इतर सात आरोपीतांनी संगनमत करून मा. श्री अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सभेत आदेशाचे उल्लंघन करून तोंडी निदर्शने करीत असताना मिळून आले आहेत वगैरे सुनील कोलबुध्दे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पो स्टे उमरी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि कदम हे करत आहेत.