गेवराई: जिल्ह्यात मनसेला धक्का, जिल्हाध्यक्ष मोटे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश घेतला
Georai, Beed | Nov 8, 2025 बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला असून जिल्हाध्यक्ष मोटे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटांमध्ये जाहीर प्रवेश घेतला आहे. मोठी यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून चांगली कामगिरी झालेली आहे. मात्र आता त्यांनी शरद पवार यांच्या विचाराला प्रेरित होऊन तसेच बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवारांचा अनेक वर्षापासून चा इतिहास आहे या सर्व गोष्टीला अनुसरून त्यांनी शरद पवार गटात जाहीर प्रवेश घेतल्याचे माध्यमांसमोर बोलताना सांगितले.