अचलपूर: फिनले मिल कामगारांच्या हक्कासाठी परतवाडा येथे भारतीय मजदूर संघाची आक्रोश रॅली
विदर्भातील फिनले मिल एकेकाळी जिल्ह्याचे वैभव मानली जायची. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडल्यामुळे शेकडो कामगार उपासमाराच्या स्थितीत आहेत. एन.टी.सी. अंतर्गत चालणाऱ्या इतर तीन मिल कामगारांना तीन वर्षांचा बोनस देण्यात आला, परंतु फिनले मिल कामगार वंचित राहिल्याने संताप उसळला आहे. या अन्यायाविरुद्ध सातत्याने संघर्ष करणाऱ्या भारतीय मजदूर संघाच्या वतीने आज परतवाडा (ता. अचलपूर) येथे कामगार आक्रोश रॅली काढण्यात आली. रॅलीचे नेतृत्व प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र दौड यांनी केले. रॅलीची सुरुवात शि