चांदूर रेल्वे: आमदुरी फाट्या नजीक चार चाकी वाहनाची दुचाकी ला धडक; दोन जण गंभीर जखमी
राजेश गोफने यांनी चार चाकी वाहन चालकाविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. राजेश याचे काका दिनेश गोफने वय 52 व त्यांचा मुलगा वय वर्ष 25 हे दोन्हीही आमला येथे राहणार तहसीलच्या कामाकरिता मोटरसायकल क्रमांक MH27BH 43 71 ने जात असताना आमदुरी फाट्याजवळ चार चाकी पिकप वाहनाने दुचाकीला समोरून धडक मारून अपघात केला. त्यामध्ये फिर्यादी यांचे काका व चुलत भाऊ गंभीररित्या जखमी झाल्याची तक्रार पोलिसात राजेश यांनी दिली आहे. तेव्हा पिकप वाहन चालकाविरोधात पोलिसांनी विविध कलमाने गुन्हा नोंद केली आहे.