रोहा तालुक्यातील आंबेघर येथील ग्रामस्थांना गेली महिनाभर पिण्याचे पाणी येत नसल्या कारणाने ग्रामस्थ पिंगोडे ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून आंदोलन करणार असल्याचे एक निवेदन ग्रामस्थांच्या वतीने पिंगोडे ग्रामपंचायत कार्यालयात दिले आहे. पाणी न मिळाल्याने कुणी पाणी देता का पाणी, अशी आरोळी मारण्याची वेळ आंबेघर ग्रामस्थांवर आली आहे.