शेगाव: एका युवकाने 39 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना कालखेड येथे घडली
एका युवकाने 39 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना कालखेड येथे १३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गावातीलच एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेगाव तालुक्यातील कालखेड येथील 39 वर्षीय महिलेने शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली तक्रारीनुसार गावातीलच एका २६ वर्षीय युवकाने महिलेचा वाइट उददेशाने पाठलाग करुन महिलेस त्रास दिला.