बदनापूर: सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे नुकसानग्रस्त मात्रेवाडी परिसरात पाहणी करताना पालकमंत्री पंकजा मुंडेची माहिती
Badnapur, Jalna | Sep 17, 2025 आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 वार बुधवार रोजी सकाळी9 वाजता बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी परिसरात 2 दिवसापासून अतिवृष्टीने झालेल्या शेतकऱ्यांच्या खरीप पिकांची पाहणी करण्यासाठी जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या आल्या होत्या यावेळी त्यांनी म्हटले आहे की शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये बऱ्याच भागात अतिवृष्टीने हे नुकसान झाले असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे सरकार आहे, हवे ती मदत आम्ही त्यांना देऊ असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे.