समुद्रपूर: गोविंदपूर येथील शेतकऱ्यांनी पहिल्यांदा बघितले आकर्षक ड्रोन फवारणी तंत्रज्ञान प्रात्यक्षिक
समुद्रपुर: केंद्रीय कृषी मंत्रालय व भारतीय कृषी अनुसंधान परिषदेयांच्या वतीने जिल्ह्यात विकसित कृषी संकल्प अभियान राबविले जात आहे.गोविंदपुर येथे पहिल्यांदा ड्रोन फवारणी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.तसेच कृषी कीर्तनाने निर्सगाला विनवणी करण्यात आली. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांशी अधिकाऱ्यांनी थेट संवाद साधण्यात येत आहे, या अभियानाचे उद्दिष्ट खरीप हंगामातील पिकांसंबंधी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे तसेच या दरम्यान विविध सरकारी योजना व धोरणाची माहिती दिली.