मानगाव: खासदार सुनील तटकरे यांच्याकडून माणगाव शहरातील व्यापाऱ्यांची भेट
जी एस टी दरात कपात झाल्यानंतर खा. तटकरे थेट बाजारपेठेत
Mangaon, Raigad | Sep 22, 2025 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात एक देश एक प्रणाली नंतर जी एस टी दराबाबत घेतलेल्या निर्णयाचे देशभरात सर्वत्र कौतुक होत आहे. देशभरात हा घेतलेल्या निर्णयाचा जी एस टी बचत उत्सव सुरू करण्यात आला आहे. याबाबत देशातील सर्व खासदारांना आपापल्या व्यावसायिक दुकानदारांना भेटी देऊन या बाबत जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर आज रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव बाजारपेठेत फेरफटका मारत दुकानदारांची भेट घेतली आणि नवीन जी एस टी दराबाबत माहिती दिली.