भंडारा जिल्ह्यातील येरली येथे झेंडा चौक येथील सार्वजनिक नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय भव्य सर्कल टेनिस बॉल नाईट क्रिकेट स्पर्धेचा आज, १७ जानेवारी रोजी सायं. ७ वाजता दरम्यान अत्यंत उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा तुमसर पंचायत समितीचे माजी सभापती तथा सदस्य नंदू रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी येरलीचे उपसरपंच डॉ. सुनील पटले, ग्रामपंचायत सदस्य गजानन कटरे, सचिन टेंभरे, पोलीस पाटील सुमित वाघमारे आणि माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष.