नागपूर ग्रामीण: हत्या प्रकरणातील आरोपीच्या पीठाभिषेकाला तृतीयपंथीयांचा तीव्र विरोध; पारडीत तणाव
शहरातील पारडी परिसरात मंगळवारी रात्री 11 वाजता ३०० ते ४०० तृतीयपंथीयांनी विश्व हिंदू परिषद (कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केल्याने मोठी खळबळ उडाली. २०१९ मधील गाजलेल्या चमचम गजभिये हत्याकांडातील मुख्य आरोपी उत्तम बाबा याच्या प्रस्तावित पीठाभिषेकाविरुद्ध हा संताप व्यक्त करण्यात आला.किन्नर महामंडलेश्वर हिमांगी सखी यांच्या हस्ते ६ मे रोजी उत्तम बाबाचा पीठाभिषेक होणार होता. एका हत्यारोपीला असा धार्मिक सन्मान देण्यास समाजाचा तीव्र विरोध आहे.