मालेगाव: मालेगाव तालुक्यातील राजमाने बस स्टँडजवळ भीषण आग; घर आणि किराणा दुकान जळून खाक
मालेगाव तालुक्यातील राजमाने बस स्टँडजवळ भीषण आग; घर आणि किराणा दुकान जळून खाक काल दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील राजमाने बस स्टँडजवळ असलेल्या प्रतापसिंग गादड यांच्या मालकीच्या घरात आणि 'राजेश किराणा जनरल स्टोअर्स' या दुकानात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत संसारोपयोगी वस्तू आणि दुकानातील मालाचे मोठे नुकसान झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.या