अलिबाग: अलिबाग सह रायगड जिल्ह्यात विश्वकर्मा विसर्जन मिरवणुका उत्साहात
Alibag, Raigad | Sep 18, 2025 रायगड जिल्ह्यात विश्वकर्मा जयंतीनिमित्ताने उभारण्यात आलेल्या मूर्तींचे विसर्जन मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात पार पडले. जिल्ह्यातील अलिबाग, पेण, उरण, माणगाव, महाड, खोपोली, कर्जत, पोलादपूर यांसह ग्रामीण भागातही विश्वकर्मा विसर्जन मिरवणुका पार पडल्या. अलिबाग शहरात सकाळपासूनच भक्तगणांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.