अकोला सायबर पोलिसांनी शेअर ट्रेडिंगमध्ये जादा नफ्याचे आमिष दाखवत २.५८ कोटींची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. फिर्यादी अजय देशपांडे यांच्या तक्रारीवरून तपास करून सोनू उर्फ सरिंदर पतले आणि जैद खान यांना नागपूरहून अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघांना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून कारवाई सायबर पथकासह अर्चित चांडक, अनिल जुमळे आणि मनिषा तायडे यांनी केली.