बुलढाणा: शहरातील मरीमाता संस्थान वीर लहुजी नगर येथे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते महाआरती
बुलढाणा शहरातील वीर लहुजी नगर येथे 14 आक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता मरी माता संस्थानतर्फे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते माता मरीमातेची महाआरती करण्यात आली.यावेळी समाज बांधव व मंदिर समितीच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी श्रीकृष्णा शिंदे, विक्की आव्हाड, मंगल भालेराव, सोनाजी अंभोरे, प्रकाश सोनुने आदी उपस्थित होते.