तळा येथे सालाबादप्रमाणे श्री चंडिका देवी यात्रा महोत्सवाचे आयोजन आयोजकांच्या वतीने भक्तिभावात करण्यात आले. या पावन यात्रेला तालुक्यातून तसेच जिल्हाभरातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावून देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. आयोजकांच्या सन्माननीय निमंत्रणास मान देत उपस्थित राहून श्री चंडिका देवीचे मनोभावे दर्शन घेण्यात आले. यावेळी आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. देवीच्या कृपेने सर्व भाविकांचे जीवन सुख, समृद्धी व आरोग्याने भरभराटीचे जावो, अशी प्रार्थना करण्यात आली.