आष्टी: आष्टी पोलीस ठाणे हद्दीत 500 च्या बनावट 64 नोटा आढळल्या, त्या एकाच्या विरोधात गुन्हा दाखल
Ashti, Beed | Oct 5, 2025 आष्टी तालुक्यातील एका इसमाने पाचशेच्या तब्बल ६४ नोटा म्हणजेच ३२ हजार रूपये व्यवहारात आणून त्या नोटा खऱ्या असल्याचे भासवून त्याचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बलनात वापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आष्टी पोलीस ठाण्यातील पो.ह.प्रविण क्षीरसागर यांच्या तक्रारीवरून प्रकाश पाराजी खाडे (२४) याच्याविरुध्द कलम १७९, १८० बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाडे वाने या पाचशेच्या बनावट नोटा कोठून आणल्या? यामागे एखादे मोठे रॅकेट आहे का? याची पोलीस चौकशी करत आहेत.