हिंगोली, आज दि. 18 : जिल्ह्यातील 'माय भारत केंद्र' हे युवकांसाठी दिशादर्शक ठरणारे असून या संधीचा लाभ युवा वर्गाने घेऊन राष्ट्रीय स्वाभिमान व एकात्मता साधून आत्मनिर्भर भारत निर्माण करावा, असे उद्गार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काढले. येथील माय भारत केंद्राच्या वतीने एकात्मता युनिटी मार्च पदयात्रेतून एकतेचा जयघोष, राष्ट्रीय अभिमान आणि स्वावलंबनाचा संदेश घेऊन येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून पदयात्रेचा प्रारंभ करताना जिल्हाधिकारी गुप्ता बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा