कर्जत: हुमगाव येथे झालेल्या अपघातात ट्रॅक्टर ने पलटी होऊन एकाचा मृत्यू
Karjat, Raigad | Sep 20, 2025 कर्जत तालुक्यातील हुमगाव येथे झालेल्या अपघातात ट्रॅक्टर ने पलटी घेतली आणि त्यावेळी झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालक याचा जागीच मृत्यू झाला आहे. टाटा पावर हाऊस येथून आलेली पेज नदी येथील मवनेच्या पुलावरती ट्रॅक्टर पलटी होऊन एकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. हुमगाव येथील रहिवाशी किशोर बागडे यांचा ट्रॅक्टर असून स्टेरिंग फिरले असता ती पुन्हा त्यांना फिरवता आली नाही त्यामुळे ट्रॅक्टर नदीच्या पुलावरून पलटी होऊन अपघात होत चालक संकेत बार्शी याचा ट्रॅक्टर खाली येऊन जागीच त्याचा मृत्यू झाला.