मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रामनगर वासियांचा लीज प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या भगिरथ प्रयत्नांमुळे रामनगर येथील लीजची जमिन फ्री होल्ड करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे रामनगरातील शेकडो भूखंड धारकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे नगरपरिषद उपाध्यक्ष प्रदीप सिंग ठाकूर यांनी दिनांक 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास प्रतिक्रिया देतांना सांगितले.