डहाणू: पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातील धानिवरी इथ सुरू असलेल्या अपूर्ण पुलाच्या काम व्यवस्थित न केल्याने ट्रक पलटी.
Dahanu, Palghar | Dec 16, 2024 धानिवरी येथील अपूर्ण पुलामुळे स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडी व अपघातांच्या घटनांचा सतत सामना करावा लागत आहे. अपूर्ण कामामुळे सर्विस रस्त्याची दयनीय अवस्था निर्माण झाली असून त्याचा परिणाम गाड्यांच्या सुरक्षित वाहतुकीवर होत आहे. आज सकाळी एक ट्रक सर्विस रस्त्यावर जाण्याच्या प्रयत्नात अपघातग्रस्त झाला. याच भागात मातीचा भराव व्यवस्थित न केल्याने एका ट्रकचा अपघात होऊन तो पलटी झाला. सुदैवाने जीवितहानी टळली.