नागपूर ग्रामीण: चिंचभवन-मनीष नगर रोडवर भरधाव ऑटो रिक्षा घुसला नाश्त्याच्या दुकानात ; मोठी दुर्घटना टळली
नागपूरमधील चिंचभवन-मनीष नगर रोडवर आज एका भीषण रस्ते अपघाताची घटना घडली. भरधाव ऑटो रिक्षा अनियंत्रित होऊन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या नाश्त्याच्या दुकानात घुसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.