चांदूर बाजार: राम भट प्लॉट चांदूरबाजार येथे व्यवसायात फसवणूक केल्या बाबत, चांदूरबाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
आज दिनांक 20 सप्टेंबरला पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चांदूरबाजार पोलीस स्टेशन हद्दीतील रामभट प्लॉट येथे, तेलाच्या व्यवसायातून फसवणूक झाली असल्याने जकीया परवीन गुलाम मुस्तफा राहणार रामभट प्लॉट चांदूरबाजार, यांनी दिनांक 19 ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजून 48 मिनिटांनी चांदूरबाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून चांदूरबाजार पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे