सरकारने जाहीर केलेल्या अतिवृष्टी मदत पॅकेजमधून आंजी परिसर वगळला गेल्याने शेतकरी नाराज होते. मात्र भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर आंजीचा अतिवृष्टी बाधित क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. आता येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असून, गफाट यांनी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार राजेश बकाने व आमदार सुमित वानखेडे यांचे आभार मानले.