जालना: महाराष्ट्र दिनानिमित्त मानेगाव येथील दीडशे विद्यार्थ्यांना ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे प्रदर्शनयुवा सेनेच्या पुढाकारातून
Jalna, Jalna | May 1, 2026 महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत जालना तालुक्यातील मानेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील सुमारे दीडशे विद्यार्थी-विद्यार्थिनींना ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट दाखविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेरणा, इतिहासाची ओळख आणि राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या आदेशाने तसेच अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. युवा सेनेचे राज्य सचिव अभिमन