जालना: जालना मर्चंट बँकेत कोट्यवधींचा ‘गोल्ड’ घोटाळा; ग्राहकांचे अस्सल सोने गायब; गुन्हा दाखल
Jalna, Jalna | May 1, 2026 बँकेत विश्वासाने गहाण ठेवलेले सोने गायब करून त्याऐवजी बनावट दागिने ठेवत ग्राहकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जालना मर्चंट को-ऑप बँकेच्या अंबड शाखेत उघडकीस आला आहे. शुक्रवार दि. 1 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी शाखा व्यवस्थापकासह बँकेतील कर्मचार्यांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुमारे 96 लाख 41 हजार 650 रुपयांचे सोने लंपास झाल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याचा भांडाफोड तक्रारदार अमोल शंकरराव गायकवाड यांच्या तक्रारीतून झाला.