नागपूर ग्रामीण: खरबी चौकात असामाजिक तत्त्वांचा वावर, नागरिकांना त्रास, चहाच्या दुकानात दारू पिण्यासाठी जागा देत असल्याचा आरोप
शहरातील खरबी चौक आणि परिसरामध्ये असामाजिक तत्त्वांचा वावर दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः, परिसरातील चहाच्या दुकानांमध्ये दारू पिण्यासाठी उघडपणे जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.दिवसाढवळ्या आणि संध्याकाळच्या वेळी चहाच्या दुकानांवर बसून मद्यपान करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. यामुळे महिला, मुली आणि शाळकरी मुलांचे तिथून चालणे देखील कठीण झाले आहे.संध्याकाळनंतर या भागात मद्यापींचा सुळसुळाट वाढतो.