रासायनिक खते, कीटकनाशकांच्या अती वापराने देशातील नापीक बनलेली जमीन सुपीक बनवून आत्मनिर्भर भारत करण्यासाठी #नैसर्गिकशेती काळाची गरज असल्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सांगितले.मोहाडी (ता. दिंडोरी) येथील सह्याद्री फार्म येथे आयोजित नैसर्गिक शेती संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.