बेलतरोडी परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने एका कारला धडक दिली. या अपघातात कार चालक अरविंद तुळाराम हारगुडे (३३) हे गंभीर जखमी झाले आहे.महेश ढाबा कटिंगजवळ ही घटना घडली. कार यु-टर्न घेत असताना मागून आलेल्या बस चालकाने निष्काळजीपणे कारला जोरात धडक दिली आणि कार फरफटत नेली