आज दिनांक 19 डिसेंबर रोजी रात्री आठच्या दरम्यान प्रभाग क्रमांक 3 सांगवी येथे वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा वंचित चे नेते प्रशांत इंगोले म्हणालेत डाके टाकणाऱ्यांना लुटले पाहिजे, निवडणुकीत सगळ्या पक्षाचे पैसे घ्या, पण वंचितच्या उमेदवारांना मतदान करा असा अजब सल्ला वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले यांनी दिला आहे. सांगवी प्रभागात वंचित पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाच्या उदघाट्न प्रसंगी वंचित चे माजी जिल्हाध्यक्ष इंगोले यांनी हा सल्ला दिला.