गडचिरोली: तात्पुरत्या फटाका परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील सर्व इच्छुकांना तात्पुरत्या फटाका साठवणूक व विक्री परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या परवान्याची मुदत पंधरा दिवसांची असून, अर्जदारांनी दिनांक 10 ऑक्टोबर 2025 पूर्वी जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांचे कार्यालयात विहीत नमुन्यातील अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही.